Education in lockdown period
टाळेबंदीच्या काळातील अध्ययन आणि अध्यापन #CCEFinland #Covid19 #CreativeLockdown #GoCorona #गोकोरोना ..................................................................... मी एक ध्वनिचित्रफित बघितली. त्यामध्ये गुगल व फेसबुक यांनी आपल्या कर्मचाय्रांना घरूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. वर्ष २०२१ पर्यंत ऑफिसला येण्याची गरज नाही. त्यामुळे कर्मचाय्रांचा जाण्या-येण्याचा भाडेखर्च, कॅंतिन यावरचा खर्च वाचेल. असेच काही बदल शिक्षणव्यवस्थेत होतील का? जे बदल होतील ते तात्पुरते असतील की कायमस्वरुपी ? त्याचे स्वरूप नेमके कसे असेल? असे बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. मागील वर्षी झालेल्या प्रचंड पावसाने त्याची एक झलक दिली होती. म्हणजे काही दिवस मुले शाळेत जाऊ न शक्ल्याने घरीच होती. स्वप्नवत वाटावे असे. सांग सांग भोलानाथ,.. शाळेभवती तळे साचून सुट्टी मिळेल का? हे प्रत्यक्षात घडले अन् मार्चमध्ये अचानक कोविड-१९ मुळे टाळेबंदी जाहीर झाली व शाळा तात्पुरत्या बंद झाल्या. ऑनलाईन शिकवण्याचा पर्याय बय्राच शाळा अवलंबताना दिसताहेत. पण त्याला स्वतःच्या अशा काही मर्यादा आहेत. जसे फायदे-तोटे प्रत्येक गोष्टीला अ...