Education in lockdown period
टाळेबंदीच्या काळातील अध्ययन आणि अध्यापन #CCEFinland #Covid19 #CreativeLockdown #GoCorona #गोकोरोना
.....................................................................
मी एक ध्वनिचित्रफित बघितली. त्यामध्ये गुगल व फेसबुक यांनी आपल्या कर्मचाय्रांना घरूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. वर्ष २०२१ पर्यंत ऑफिसला येण्याची गरज नाही. त्यामुळे कर्मचाय्रांचा जाण्या-येण्याचा भाडेखर्च, कॅंतिन यावरचा खर्च वाचेल. असेच काही बदल शिक्षणव्यवस्थेत होतील का? जे बदल होतील ते तात्पुरते असतील की कायमस्वरुपी ? त्याचे स्वरूप नेमके कसे असेल? असे बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. मागील वर्षी झालेल्या प्रचंड पावसाने त्याची एक झलक दिली होती. म्हणजे काही दिवस मुले शाळेत जाऊ न शक्ल्याने घरीच होती. स्वप्नवत वाटावे असे.
सांग सांग भोलानाथ,.. शाळेभवती तळे साचून सुट्टी मिळेल का?
हे प्रत्यक्षात घडले अन् मार्चमध्ये अचानक कोविड-१९ मुळे टाळेबंदी जाहीर झाली व शाळा तात्पुरत्या बंद झाल्या.
ऑनलाईन शिकवण्याचा पर्याय बय्राच शाळा अवलंबताना दिसताहेत. पण त्याला स्वतःच्या अशा काही मर्यादा आहेत. जसे फायदे-तोटे प्रत्येक गोष्टीला असतात, तसेच याबाबतीतही.
फायदेः
१) स्थळ-काळाची लवचिकताः प्रत्येक विद्यार्थी हा त्याला सोयीच्या स्थळी व वेळी शिकू शकतो. म्हणजेच आपापल्या घरातून जगात जिथे असेल तिथे आपल्या सोयीच्या वेळी विद्यार्थी शिकू शकतात. 'ई-लर्निंग'मुळे शिक्षण स्त्रोतांची उपलब्धता भरपूर वाढते.
२) माध्यमाची लवचिकताः 'ई-लर्निंग'द्वारे शिक्षण हे डेस्कटॉपवर, लॅपटॉपवर, आयपॅडवर अथवा स्मार्टफोनवरही घेणे शक्य आहे.
३) वेगवेगळ्या क्षमतांसाठी वेगवेगळी शिक्षणपद्धती अवलंबता येतेः उच्च शैक्षणिक क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांस आवश्यक असणारी आव्हाने आणि त्यासोबतच कमी क्षमतेच्या विद्यार्थ्यांना द्यावा लागणारा जास्त वेळ, हे सर्व 'ई-लर्निंग'मध्ये सहज शक्य होते.
४) कमी किंमतीत जास्त उपलब्धताः या पद्धतीमुळे शिक्षणाची उच्च गुणवत्ता कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त उपलब्ध होऊ शकते. सरकारने जाहीर केले आहे की, जोपर्यंत शाळा सुरू होत नाहीत, तोपर्य्ंत दूरचित्रवाणी व आकाशवाणीवरून मुलांना पाठ शिकवले जातील.
५) उच्च गुणवत्ताः 'ई-लर्निंग'मुळे मात्र प्रयत्नपूर्वक आणि व्यवस्थित नियोजनानंतर प्रथम प्रती व्याख्यान निर्मिती करता येते. सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ती देता येते.
काही विद्यार्थी दृकश्राव्य व्याख्यानाचा वापर करून पाठ्यपुस्तकाच्या सहाय्याने स्वयं अध्ययन करू शकतात. पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत शिक्षण हे शिक्षक-केंद्री असते. पण 'ई-लर्निंग' वर्ग मात्र साहजिकच विद्र्यार्थी केंद्री असतात.
६) पुनर्वापरः एखादे ध्वनिचित्रमुद्रित करून ठेवलेले व्याख्यान जरूर पडेल तसे पुन्हा पुन्हा वापरता येते.
'ई-लर्निंग'चे तोटेः
१) विशेष क्षमतांची गरजः संगणक साक्षरता ही अतिशय गरजेची. त्याशिवाय संकेतस्थळे बघणे, लेखन अथवा दृकश्राव्य माध्यम संकेतस्थळावर टाकणे इत्यादि विविध क्षमता शिक्षकांकडे असणे आवश्यक आहे.
२) किंमतः शैक्षणिक संस्थेला अथवा शिक्षकाला किमान भांडवल गुंतूवणूक करणं भाग आहे.
३) आधारभूत संरचना म्हणजेच 'इन्फ्रास्टृक्चर' असंणं आवश्यक आहे.
४) समायिकीकरणः ऑनलाईन शिक्षण देण्यात संगणक व आंतरजाल-महाजाल यांचं समायिकीकरण म्हणजेच 'इंटिग्रेशन' असणं आवश्यक आहे.
५) सर्वोत्कृष्ट सॉफ्टवेअर उपलब्ध नाहीः अजूनपर्यंत शिक्षक व विद्र्यार्थी यांच्या गरजांप्रमाणे सर्वंकष सेवा देणारे एकही सॉफ्टवेअर उपलब्ध नाही.
उपायः
तोटे कमी करणे हा एकमेव उपाय आपल्याला सध्या उपलब्ध आहे. वरील सर्व मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा सोडला तर सगळ्याच बाबतीत आपल्याला पर्याय उपलब्ध करून हवे आहेत ते सुद्धा कमी किंमतीत. नुकतेच मी माशेलकर सरांचे व्याख्यान ऐकले. त्यांनी सांगितले की जसे भारतीय लोकांनीच, आता खेडोपाड्यांत सहज वापरता येईल असे पर्यायि ई.सी.जी. मशीन तयार केले आहे, तसेच कमी किंमतीत महाजाल सेवा व त्याचे संगणकांबरोबर समायिकीकरण शक्य नाही का? शहरातील विद्याथ्यांना या सुविधा उपलब्ध आहेत अथवा होऊ शकतील. पण प्रश्न आहे तो ग्रामीण विद्यार्थ्यांचा. पण आपला 'भारतीय जुगाड' आहे त्या उपलब्ध गोष्टींचा/स्त्रोतांचा उपयोग करून संगणकाद्वारे हे ऑनलाईन शिक्षण तळागाळापर्यंत पोहचवणे आवश्यक आहे.
मी आशावादी आहे असा प्रगत 'आत्मनिर्भर' भारत बघायला मिळण्यासाठी.
मेधा कुलकर्णी
Phone number 9890325745
medhakulkarni68@gmail.com
टाळेबंदीच्या काळातील अध्ययन आणि अध्यापन- अतिशय समर्पक शब्दात मांडले आहे. फायदे आणि तोटे ह्या शिवाय उपायांची सुद्धा चर्चा केली आहे हे महत्त्वच!!
ReplyDeleteThank you Pragati
DeleteThank you very much 😊
ReplyDelete���� aapratim
ReplyDeleteThought provoking. I share your optimism, and hope we jugadus can turn those cons into opportunities to grow.
ReplyDeleteThank you Vinit....
ReplyDeleteकाकू खूप छान ..!!
ReplyDeleteSachin thank you..... ग्रामीण मुलांसाठी एक computer किंवा जास्तीत जास्त दोन....... त्यांनी group करावे timetable बनवावे..... आणि शिकावे
ReplyDeleteThank You..!!
DeleteExcellent blog
ReplyDeleteThank you very much..... please let me know your name
ReplyDelete