मी मानसकन्या
मी मानसकन्या
आजकाल आई-वडील व मुले अशा विभक्त कुटुंबपद्धतीत जरा वेगळं वाटेल, असं नातं जपलेल्या, 'आई'इतक्याच प्रेमानं वागणाय्रा, फलटणला आमच्या शेजारी राहणाय्रा, पद्मावती कळसूर काकूंची मी जणू मानसकन्याच. आधी त्याही शासकीय कर्मचाय्रांच्या वसाहतीत आमच्या शेजारीच राहायच्या. पण नंतर त्यांनी शासकीय कार्यालयापलिकडे स्वतंत्र बंगला बाधून तेथे ते कुटुंब राहायला गेलं. पण ते अंतरही माझ्यासाठी अन् माझ्या धाकट्या भावासाठी फार नव्हतं. कारण आई रागावली की मी पिशवीत माझे कपडे भरून कळसूर काकूंकडे राहायला जायची.
कळसूर काकूंचं व्यक्तिमत्व अगदी सोज्वळ आणि वागाय-बोलायला खूप सालस. कायम नऊवारी साडी नेसायच्या. केसांचा अबाडा अन् त्यावर दारातल्या फुलांचा छानसा गजरा माळलेला. माळजाई देवीच्या मंदिरात जवळजवळ रोज किर्तन ऐकण्यासाठी त्या मला घेऊन जायच्या. त्यांच्या सगळ्या वस्तू जणू माझ्यासाठीच असत. मी पाच-सहा वर्षांची असेन, पण मला त्या त्यांच्यासाठी आणलेली नवीन नऊवारी साडी घडी मोडायला देत. नवीन साडीचा पिळा देवासमोर ठेवून त्याला हळद-कुंकू वाहून मग मी ती नेसायची. थोडं मिरवून येवून, पुन्हा फ्रॉकमध्ये हळदी-कुंकू समारंभाला काकूंना सर्वकाही मदत करायला मी तय्यार. माझा मुक्काम जवळजवळ त्यांच्याचकडे असे, अस्ं म्हंटलं तरी चालेल. ते कुटुंब कर्नाटकी असल्यानं सोवळं-ओवळं कडक. पण कळसूर काकांचे (अनंत उर्फ अण्णा) त्याबाबतचे नियम इतके अंगवळणी पडून गेले होते की त्यांचा जाच नाही वाटायचा.
काही वर्षांनी, शासकीय सेवेतील माझ्या वडिलांची बदली फलटणहून भीमानगरला झाली. तिथून उन्हाळ्याच्या सुट्टीत मी फलटणला जात असे किंवा देवदिवाळीची जत्रा झाली की कळसूर काकू अन् अण्णा आमच्याकडे जत्रेतील वस्तू घेऊन यायचे.
कालौघात ते दोघेही राहिले नाहीत. पण त्यांनी माझ्यावर त्यांच्या मुलांपैकीच एक मुलगी मानून केलेलं निर्व्याज प्रेम विसरू शकत नाही. तिन्हीसांजेच्या दिवेलागणीला तुळशीसमोर दिवा लावणारी काकूंची कृश प्रतिमा डोळ्यांसमोर तरळते, तेव्हा त्यांच्याशी काही काळ जुळलेलं नातं म्हणजे जन्मजन्मांतरीचे ऋणानुबंधच वाटतात.
मेधा श्रीपाद कुलकर्णीसी २१ सुयोग आदित्य रेसिडेन्सी नं.२,बिबवेवाडी, पुणे ४११०३७
Khup sundar article...👌👌
ReplyDeleteThank you Shivangi ....
Deleteखूप छान लिहिलं आहेस मेधा...👌👍
ReplyDeleteThank you very much..,.is this Supriya
DeletePlease write your name
DeleteWho is this?
DeleteWonderful mam.. I cud actually visualise u as 6 year old.. also how traditions have rendered over the years..I could feel the essence of timelessness in this excerpt..also I could compose a beautiful picture of your aunt lighting up a diva in front of the tulsi in evening!!
ReplyDeleteTradition renders over years and generation s...that is true.....and she was the pure soul....
Deleteखूप सुंदर
ReplyDeleteThank you Santosh
DeleteSuperr
ReplyDeleteJayesh Mutha
Superr
ReplyDeleteJayesh Mutha
Superr
ReplyDeleteJayesh Mutha
Thank you Jayesh Mutha
Deleteसुंदर आठवणी नेहमीच आपल्या जवळ राहतात
ReplyDeleteसुंदर आठवणी नेहमीच आपल्या जवळ राहतात
ReplyDeleteहो ,....अगदी बरोबर
Deleteखूपच सुंदर काकु बालपणीच्या निरागस आठवणी शब्द रूपात मांडून वाचण्यासाठी उपलब्ध करून दिल्या.त्याचबरोबर तुम्हीं तुमच्या बालपणीच्या आठवणीं आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरतील..!!
ReplyDeleteThank you Sachin ......तु तुझे लिखाण चालू ठेव. 👍👍😍
Deleteहो काकु,वाचन चालू आहे त्यानंतर करेल लिखाण..🙏🙏
Delete