Posts

Showing posts from August, 2020

मी मानसकन्या

  मी मानसकन्या आजकाल आई-वडील व मुले अशा विभक्त कुटुंबपद्धतीत जरा वेगळं वाटेल, असं नातं जपलेल्या, 'आई'इतक्याच प्रेमानं वागणाय्रा, फलटणला आमच्या शेजारी राहणाय्रा, पद्मावती कळसूर काकूंची मी जणू मानसकन्याच. आधी त्याही शासकीय कर्मचाय्रांच्या वसाहतीत आमच्या शेजारीच राहायच्या. पण नंतर त्यांनी शासकीय कार्यालयापलिकडे स्वतंत्र बंगला बाधून तेथे ते कुटुंब राहायला गेलं. पण ते अंतरही माझ्यासाठी अन् माझ्या धाकट्या भावासाठी फार नव्हतं. कारण आई रागावली की मी पिशवीत माझे कपडे भरून कळसूर काकूंकडे राहायला जायची. कळसूर काकूंचं व्यक्तिमत्व अगदी सोज्वळ आणि वागाय-बोलायला खूप सालस. कायम नऊवारी साडी नेसायच्या. केसांचा अबाडा अन् त्यावर दारातल्या फुलांचा छानसा गजरा माळलेला. माळजाई देवीच्या मंदिरात जवळजवळ रोज किर्तन ऐकण्यासाठी त्या मला घेऊन  जायच्या. त्यांच्या सगळ्या वस्तू जणू माझ्यासाठीच असत. मी पाच-सहा वर्षांची असेन, पण मला त्या त्यांच्यासाठी आणलेली नवीन नऊवारी साडी घडी मोडायला देत. नवीन साडीचा पिळा देवासमोर ठेवून त्याला हळद-कुंकू वाहून मग मी ती नेसायची. थोडं मिरवून येवून, पुन्हा फ्रॉकमध्ये हळदी-कुंकू स...

मैत्रीदिनाच्या निमित्ताने.....

Image
सुंदर वास असलेली चाफ्याची फुले, अतिशय दुर्मिळ म्हणता येईल असं अनंताचे फुल ( फारच छान मोहक सुगंध असतो या फुलांना),करदळीचे वेगवेगळे रंग, जास्वंदीची पण अनेक रंग, नाजूक सायली,सायली पेक्षा थोडी मोठी फुले असलेली जाई,मोगरा, पारिजातक, सोनटक्का हि सर्व फुले माझ्या सोसायटीच्या परिसरात आहेत. कल्पना करा हि सर्व फुले मी जर एका ताटात घेतली तर ते ताट जसे सुगंधाने, रंगाने व फुलांच्या मोहकतेने खुलुन दिसेल. अहो तसेच आहे माझे आयुष्य माझ्या असंख्य मित्र-मैत्रिणी नी भरलेलं. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, जात निराळी,ध्येय वेगळी व आवड वेगळी.अशा असंख्य मित्र-मैत्रिणी पैकी काही मोजक्या मित्र मैत्रिणी बद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यातील एक नाव आपल्या परिचयाचे आहे. ती काव्य वाचनाचे कार्यक्रम करते.विजय वल्लभ स्कूल मध्ये शिक्षिका आहे.अभिनय तर ती अगदी सहज करते.मला वाटते आत्तापर्यंत तुम्ही नाव ओळखले असेल. प्रगती जोशी. मैत्री होणे हि एक सावकाश प्रक्रिया आहे.त्यामुळे ती शाळेत आली व आमची मैत्री झाली असे काही घडले नाही. Physics मध्ये Resonance effect असतो ;त्यात frequency match व्हावी लागते , तशीच मैत्रीत सूर जुळावे ला...