संचारबंदी - सृजनाची संधी
#CCEFinland #Covid19 #CreativeLockdown #GoCorona #गोकोरोना
सृजनशील शिक्षण या विषयावर CCE Finland यांनी मराठी conference आयोजित केली आहे ती १० जून ते १२ जून चालणार आहे.
सृजनशील शिक्षण म्हणजे नवनिर्मातीतून शिक्षण.....
विज्ञान शिक्षणात शास्त्रज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात त्यातून त्यांना काही नविन शिकल्याचा अनुभव येतो....रुदरफोर्ड ने केलेला gold foil experiment अथवा युरेका हा शब्द प्रसिद्ध आहे तो आर्किमिडीज घ्या. सर्व नवर्निमीतीतून घडले आहे. तेव्हा सृजनशीलता हा शिक्षणाचा गाभा आहे.
अर्ब्लट आइनस्टाइन म्हणतो " creativity is important than knowledge"
CCE Finland आयोजित या कार्यक्रमात सहभागी पाच देश झाले आहेत .
भारत, USA, Sweden, Nigeria, Finland .
Heramb Kulkarni and Shirin Kulkarni यांनी परिषदेची सुरुवात केली व नंतर दोन sessions मध्ये हा कार्यक्रम झाला . 
यामध्ये डॉ. वनिता पटवर्धन यांनी मुख्य वक्ताची भुमिका बजावत एक नवीन संकल्पना दिली ती म्हणजे अभ्यासातील अवकाश . जसे आपण आपले घर फर्निचरने भरून टाकत नाही तसेच मुलांना अभ्यासात थोडा वेळ मोकळा द्यावा जेणेकरून ते समजून घेऊ शकतील.त्यांनी तीन सुत्रे सांगितली 
१) आपले सादरीकरण आर्कषक बनवा .( Make it attention worthy)
2) पुन्हा पुन्हा संकल्पना सांगून पक्कया करा.( Drilling)
3) आपल्या शिकवण्यासंबधी मुलांना काही तरी कृती करायला द्या.( Utilise active recall) 
या session मध्ये माधव मराठे, संध्या सांमत, अचला वर्मा, प्रियदर्शनी नहार, छाया गोलटगावकर, नेहा ठाकूर या,तज्ज्ञांनी सहभाग घेतला.
सर्व चर्चा सकारात्मक झाली पण त्यामुळे नक्की प्रेक्षकांचे अनुभव विश्व समृद्ध झाले.
दुसरे सत्र हे संचारबंदी- सृजनाची संधी या शिर्षका ने झाली. मला हे सत्र फारच छान व उपयोगी वाटले.
याचे प्रमुख वक्ते होते ....प्रमोदभाई शिंदे .
यांनी गुणदोषांची सापशिडी असा खेळ सांगितला . तो फारच कृती शील, मनोरंजन व माहिती देणारा होता.
डॉ बापट यांनी गणित विषय कसा रंजक बनवता येईल हे सांगितले.
मुख्य म्हणजे यात सत्रात काही गंभीर प्रश्न चर्चिले गेले जसे की online teaching मध्ये पालकांना लक्ष द्यावे लागते तर मग जे काम करणारे पालक आहेत ते कसे लक्ष ठेवणार. त्यावर पर्याय पण सांगितला गेला कि network limited accessदेणे इ.
एकंदरीत फार चांगल्या प्रकारे आयोजन व बोलवलेले तज्ञ हे उत्तम मार्गदर्शन करणारे असे आहेत. 
मी सर डि.म.पेटीट , संगमनेर. ची विद्यार्थिनी आहे आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य होते.
" धावत्या ला शक्ती येई आणि मार्ग सापडेल"
Post covid19 नक्की च शिक्षण पद्धती विद्यार्थी क्रेदित होईल.

Comments

Popular posts from this blog

मी मानसकन्या

Education is the most powerful weapon